विमा कंपन्या चा टोल फ्री नंबर बंद आँनलाईन तक्रारी मध्ये शेतकऱ्यांना अडचणी ..

Khozmaster
1 Min Read

सतीश मवाळ मेहकर तालुक्यातील बर्याच भागामध्ये दिनांक 6व 7 नोव्हेंबर 2022 ला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकाचा नुकसानीबाबत ची माहिती ज्या शेतकरी बांधवांनी खरीप 2022= 23 मध्ये पिक विमा काढलेला आहे त्यांनी नुकसानीची माहिती प्रधानमंत्री फसल विमा योजना चे ॲप मध्ये नोंदवावी.किवा पीक विमा कंपनी ला फोन द्वारे 48 तासाच्या देणे बंधनकारक आहे. मागील महिन्यांमध्ये पाऊस पडून ही नुकसान झालेल्या तक्रारी करण्यासाठी बर्याच शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला .व सध्या दोन दिवसा पासुन परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.त्यांनी 2022 खरीप चा विमा काढला असल्यास त्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने चा मोबाईल ॲप मध्ये डाउनलोड करून त्यात आपल्या नुकसानीची माहिती भरावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा संपूर्ण आढावा घेण्यास व विमा भरपाई साठी मदत होतील असे प्रशासनाकडून बोलले जाते!.सोयाबीन ,कपाशी तसेच इतर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येते पण सर्व सामान्य शेतकरी वर्गाकडे आजुन ही साधे फोन असुन त्यांना तक्रार कशी करायची जमत नसल्याने मागील वर्षी वंचित राहीले व यंदा ही वंचित राहणार का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्ग मध्ये बोलल्या जात आहे. तरी प्रशासन लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *