अकोला – जिल्हा परिषदचे आरोग्य विभाग व वाय.आर.जी. केअर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी येथे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये कापशी येथील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण करण्यात आले. तसेच पुरुष व महिलांचे आरोग्य तपासण्या करुन मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीराला जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा वाघमारे, कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उमेश ताठे, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व वायआरजी केअरचे नितीन डोंगरदीवे, जिल्हा प्रशासक समन्वयक रवी मांजरे, डाटा मॅनेजर मिना इंगळे, फिल्ड मोबिलायझर समाधान क्षीरसागर व इतर जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कापशीचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले.