पांढरा सोन्याची श्रीमंती यावर्षी शेतकऱ्यांना ठेवणार दूरच…! अपेक्षित उत्पादनात होणार घट.

Khozmaster
2 Min Read

विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी : अकोट पिकांची वाढ खुंटली.तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने खरिपातील सर्वच पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे शेतात पाणी थांबल्याने पिक करपली काही ठिकाणी कपाशी पिकांची वाढ थांबली तर काही ठिकाणी चांगली वाढ होऊनही बोंडांची संख्या कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनात प्रचंड घट होणार असल्याने पांढरा सोन्याची श्रीमंती यंदा शेतकऱ्यांना दूरच ठेवणार असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षीपेक्षा यंदा शेतकरी शेतात जास्त खर्च आणि मेहनत करत असल्याचे दिसून येत आहे परंतु होणाऱ्या उत्पन्नातून त्याचा खर्च आणि मेहनत भरून निघणार की नाही या चिंतेत तो सतत आहेच कपाशीला भाव असला तरी उत्पन्नाचा ताळमेळ जर हुकला तर यंदाची शेती त्याला तोटाची राहणार असल्याचे समजते खारपानपट्ट्यातील सर्व शेती नैसर्गिक पावसाच्या भरोशावर असल्याने पाऊस कमी किंवा जास्त पडल्यास प्रत्येक वर्षी होणारे उत्पादन सारखे नसल्याने कोणत्या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादनाचा ताळमेळ बिघडेल हे सांगता येत नाही उत्पादनाचा ताळमेळ बसण्यासाठी खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांना शासनाने ओलीता खाली आणले पाहिजे असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

मूंग नाही दिसला डोळ्याने.

यंदाच्या खरिपात बऱ्याच शेतकऱ्यांनी मुंग पिकाचा पेरा केला होता परंतु अतिवृष्टीने अपवाद वगळता सर्व मूंग उत्पादक शेतकऱ्यांना दगा दिला अनेक शेतकऱ्यांना मुगाचा दाणाही झाला नाही त्याचप्रमाणे सोयाबीनचे पीकही अंधांतरीत आहे.

वन्य प्राण्यांकडून नासाडी.कपाशी पिकात वन्यप्रांकडून नासाडी होत असून आधीच कमी असलेल्या अर्धपरिपक्व बोंड्यांवर माकड आणि डुकरे हल्ला चढवत असून अनेकदा शेतकऱ्यांना वन्य प्राणी हाकलण्यासाठी रात्रीला शेतात जावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *