औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात औरंगाबाद जिल्ह्यातील दावरवाडी येथे समोरून येणाच्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटने भरलेला ट्रक सरळ नदीत कोसळला. ही घटना पाचोड़ पैठण राज्य मार्गावरील दावरवाडी (ता. पैठण) येथे गुरुवारी (दि. सहा) रात्री घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.तेलंगणा राज्यातून सिमेंटने भरलेला ट्रक ए ५६३६३९ नाशिक कडे पाचोड पैठण मार्गाने जात होता दावरवाडी नदी पुलावर समोरून अचानक भरधाव एक खासगी ट्रँव्हलला वाचवण्यासाठी प्रयत्नात ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट नदीत कोसळला. मध्यरात्री ची वेळ असल्याने चालकाला देखील परिसराचा अंदाज आला नाही.दरम्यान, नदीचे पात्र पाण्याने तुडुंब भरलेले आहे त्यात ट्रकचा समोरील भाग पाण्यात बुडाला होता. चालक, बलिनर दोघेही ट्रकच्या कॉवनमध्ये दबले गेले होते. पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर ट्रकच्या कॉवनमधून स्वतःची कशीबशी स्वतःचा जीव वाचू शकले.अपघात घडल्यानंतर बाजूला एका दुकानाचे मालक बशीरभाई शेख यांनी घटनास्थळी जाऊन धीर दिला. नादर बीटजमादार किशोर शिंदे, पोलीस नाईक फिरोझ बडेँ,वाहनचालक ए.व्ही.काकडे आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दावरवाडी नदीत कोसळलेला ट्रक.
Users Today : 43