पालघर जिल्हा प्रतिनिधी.नवल तेजराव सिरसाट.तीन ऑक्टोबर २०२२ रोजी पालिका रूग्णालयात जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाच्या नावे६१६१ रूपयांची एफ.डी. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर म्हणजे पालघर वसई-विरारचे लाडके व्यक्तीमत्व. अप्पांसाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता नेहमीच अग्रस्थानी राहिलेला असून त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात. वाढदिवसानिमित्त मोठमोठे बॅनर, पुष्पगुच्छ व भेटवस्तु यावर पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा त्या पैशांनी लोकोपयोगी कामे करा, असा अप्पांचा नेहमीच अट्टाहास असतो. आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या याच हाकेला साद देत मा. सभापती रमेश घोरकना, कन्हैया (बेटा) भोईर व मा. नगरसेवक मिलींद घरत यांनी अप्पांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून त्यांना अनोखी भेट दिलेली आहे. दरवर्षी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर (अप्पा) यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदाचा वाढदिवस एकसष्ठीपुर्ती सोहळा असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झालेले होते. अप्पांच्या या एकसष्ठीपुर्तीनिमित्त ०३ ऑक्टोबर या दिवशी महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक नवजात बालकास माजी सभापती रमेश घोरकना, कन्हैया (बेटा) भोईर व माजी नगरसेवक मिलींद घरत या त्रिमुर्तीकडून सहा हजार एकशे एकसष्ट रूपयांची एफ.डी. दिली जाणार आहे. यानुसार जुचंद्र-नायगाव पुर्व माता बालसंगोपन केंद्रात जन्मलेल्या एका बालकाच्या वडिलांना रू.६,१६१/- ची एफ.डी. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आलेली आहे. सदरची एफ.डी. बँकेत २१ वर्षापर्यंत कायम ठेवल्यास पन्नास हजारापर्यंत रक्कम जमा होऊन ती बालकाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नकार्यासाठी कुटूंबियांना वापरता येऊ शकणार आहे. तसे आवाहन बालकांच्या कुटूंबियांना करण्यात येणार आहे. वसई-विरार महापालिका रूग्णालयात दर दिवशी जन्मणाऱ्या बालकांची सरासरी ४० ते ८० इतकी असून ०३ ऑक्टोबर रोजी जन्मणाऱ्या सर्व बालकांना रूपये ६,१६१/- इतक्या रक्कमेची एफ.डी. देण्यात येणार आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांना ही आगळीवेगळी संकल्पना खूप आवडली असून त्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. न्युज चॅनल व इतर प्रसारमाध्यमांनी या अनोख्या उपक्रमाची दखल घेतलेली असून सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Users Today : 25