मराठी लोककलेचा आदर करणाऱ्या कर्नाटक येथील लोककलावंतांचा मनसे ने केला सत्कार

Khozmaster
2 Min Read

चिखली:- पोटाची खळगी भागवण्यासाठी कर्नाटक येथुन महाराष्ट्रात उदरनिर्वासाठी आलेल्या कलावंतांनी महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषेमध्ये लोकगीते सादर करणारे पथक आज शहरामध्ये आले होते. त्या लोककलावंतांची मराठी भाषेवरील पकड व प्रेम बघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच चिखली शहरातील प्रसिद्ध पत्रकार मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या लोककलेचा आदर करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. रामलीला भजनी मंडळाचे राजू व्यंकटेशप्प धूपम, दुर्गेश हनुमंतअप्प, चंद्रकांत व्यंकटेशअप्प धुपम, मंजुनाथ व्यंकटेशअप्प धुपम, रामेश हनुमंतअप्प मांतू, रा. सोमेश्वर नगर वॉर्ड नं१५, तालुका- हगरीबोम्मनहल्ली, जिल्हा बेल्लारी, कर्नाटक राज्य येथील या कलाकारांनी आपल्या भक्ति गीते,भाव गीते,भजन,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील गीते अगदी मराठी भाषेत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांच्या हस्ते या कलाकारांचा सत्कार करण्यात आला,सत्कार स्विकारून आम्हाला आनंद झाल्याचे व प्रथमच पक्षाच्या वतीनेआमचा असा सत्कार होत असल्याचे सांगून राजू व्यंकटेशप्प धूपम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त करून पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद खारपास, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे,उपजिल्हाध्यक्ष राजू परिहार, मनशेसे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, वाहतूक सेनचे नारायणबाप्पु देशमुख,प्रसिद्ध पत्रकार कैलास गाडेकर, संपादक छोटू भाऊ कांबळे, मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्निल आसोले, स्वाभिमानी शेतकरी सेनेचे नेते विनायक सरनाईक, मनवीसे उप तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, विभाग अध्यक्ष समाधान म्हस्के,सतीश सोनुने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *