मेहकर :- स्थानिक महेश सेलिब्रेशन हॉल मध्ये काल संपन्न झालेल्या महेश परिवार आयोजित सामाजिक कार्यक्रमात मानवी संगणक म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले, तसेच महाराष्ट्राचा गौरव असलेले प्रा. गौरव भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की जिंकणारा वेगळ काही करत नसून, प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करत असतो. याचबरोबर इतरांसाठी टाळी वाजवणारे बनण्या पेक्षा स्वतःसाठी टाळी वाजवणारे बना. हे प्रा. गौरव भंडारी यांनी आपल्या कर्तुत्वाने विद्यार्थ्यांना पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तरे देत अभ्यास कसा करावा, अभ्यासाबद्दल गोडी कशी निर्माण करावी हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी कार्यक्रमाला मेहेकर नगरीतील शेकडो पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रेमराजजी भाला यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री गोपाल भाऊ मोदानी अध्यक्ष महेश अर्बन मेहकर हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये श्री सुदेशभाऊ लोढे, श्री ऋषीभाऊ जाधव, डॉ. श्री हेमराज लाहोटी, डॉ. श्री रामजी शिंदे, श्री हर्षलजी सोमन, श्री भूषनभाऊ मीनासे, डॉ श्री क्षीरसागर साहेब, डॉ. श्री धनराज राठी व श्री सिद्धेश्वरजी पवार हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हाडे सर व बिजेवार सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य सौ. ज्योती मंत्री मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जी लोहिया सर, प्राचार्या सौ. ज्योती मंत्री मॅडम व उपप्राचार्य श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
Users Today : 61