आमिष दाखवीत लग्रानाचे तरुणीवर केला अत्याचार यावल पोलिसात गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्ऐ ९ ऑक्टोबर २०२२ । लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरिक संबंध ठेऊन नंतर जबरदस्ती तीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी निलेश पंढरीनाथ पाटील असे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२१ ते जुन २०२२ पावेतो वेळोवेळी संशयित आरोपी निलेश पाटील याने पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयित आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारिरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणीला गर्भधारणा झाली. यानंतर निलेश याने पिडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा गर्भपात केला. या प्रकरणी दि. ८ ऑक्टोंबर रोजी बलात्कार, अॅट्रासीटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *