आता हंडा पाणवठ्यांवर नव्हे तर पाणवठ्याचे पाणी घरातील नळापर्यंत येईल

Khozmaster
4 Min Read

आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील धाड: जग हाताच्या बोटावर आलेले आहे . हातातील मोबाईलच्या माध्यमातून साता समुद्रापार असलेल्या व्यक्तीसोबत मोबाईलचे बटन दाबताच केवळ संभाषणच नव्हे तर एकमेकांना आपण पाहू सुद्धा शकतो. झुकझुक करीत मामाच्या गावाला जाणारी रेल्वे गाडीने ही आता प्रचंड वेग घेतलेला असून झुकझुक करणारी रेल्वे गाडी बुलेट वेगाने धावत आहे. मानव चंद्रावरच नव्हे तर अनेक ग्रहावर जाण्याच्या तयारीत आहे. मानवाने स्वतःच्या कुशाग्र बुद्धीने जे जे शक्य नव्हते ते ते शक्य करुन दाखविले. परंतु अद्यापही इतका पाऊस पडुन ही दरवर्षी प्रचंड पाणी टंचाई निर्माण होते. पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असताना ही आपण नागरिकांना आपण पाणी देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. परंतु आता या शोकांतिकाचा अंत होण्याची वेळ आली आहे. पंत प्रधान नरेन्द्र मोदी यांनी प्रत्येक घरात नळ देण्याचा संकल्प केलेला आहे . त्यासाठीच जल जिवन मिशन अंतर्गत पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव , प्रत्येक घर स्वयं पुर्ण करण्याचे असल्याने आता काही दिवसातच हंडा पाणवठ्यांवर नव्हे तर गावाबाहेरील पाणवठ्याचे पाणी घरातील नळापर्यंत येतील असे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी कुंबेफल येथील जलजीवन मिशन अंतर्गत 1.09 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळ्यावेळी केले.          दि 8/10/2022 रोजी भडगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत 1.09 कोटी 37 लक्ष रुपये इतक्या किमतीच्या सुधारात्मक पुनर्जोडणी कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.            या भव्य भूमिपूजन सोहळ्यास देविदास पाटील जाधव, सुनीलभाऊ देशमुख, योगेश राजपूत, सरपंच रामेश्वर बुधवंत, संदीप उगले, गजानन जाधव, अनिल जाधव, डाॅ. तेजराव नरवाडे, कल्याणराव कानडजे, सिध्देश्वर लडके, साहेबराव वाघ, सुरेश आघाव, समाधान दांडगे पोलिस पाटील, समाधान आघाव, देवेंद्र पायघन, गजानन आघाव, अंबादास वाघ, अरुण पाटील, एकनाथ वाघ उपसरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.जन सुविधा केंद्र गावात होणे गरजेचे मौजे म्हसला बु. येथे जनसुविधा केंद्राचे भूमिपूजन गावागावात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही . प्रत्येक गावातील लोकसंख्या वाढल्यामुळे गावातली चावडी ही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अपुरी पडत आहे. त्यामूळे गावात होणारे सार्वजनिक व शासकीय कार्यक्रम करण्यासाठी मर्यादा येत असल्याने चिखली विधान सभा मतदार संघातील महसुली मंडळच्या ठिकाणी जन सुविधा केंद्र बांधकाम करुन त्या मंडळातील गावातील सार्वजनिक कार्यक्रमाची व्यवस्था केली. ही जन सुविधा केंद्र लोकोपयोगी असल्याने प्रत्येक गावात जन सुविधा केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी म्हसला येथील जन सुविधा केंद्र इमारत बांधकामाचा भूमिपूजन करताना केले.             चिखली विधानसभा मतदारसंघातील म्हसला बु. येथे 35 लक्ष रुपये किमतीच्या जनसुविधा केंद्राचे उद्घाटन आज 8 /10/2022 रोजी केले.              या वेळी देवीदास पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, ॲड. सुनील देशमुख तालुका अध्यक्ष भाजप, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, संदीप उगले पंचायत समिती सदस्य, डॉ. तेजराव नरवाडे, गजानन देशमुख, राजू भाऊ चांदा, सिद्धेश्वर लडके,देवेंद्र पायघान, पुरूषोत्तम भोंडे, अरुण भोंडे, अनिल जाधव, गजानन जाधव तालुका उपाध्यक्ष भाजपा, सरपंच सौ. सीमा भोंडे, वसंता उबाळे, सौ. स्वाती भोंडे, वैशाली शेळके, विष्णु तायडे, शिवाजी तायडे, सुखदेव भोंडे, गणेश भोंडे, सचिन भोंडे, सागर महाराज भोंडे, अमोल उबाळे, सोनु तायडे, अनिल अपार, कैलास भोंडे, सतीश पाखरे, सारंगधर भोंडे, विष्णु भोंडे, गुलाबराव भोंडे, राजू शेळके, प्रशांत शेळके, संजय भोंडे, विजय भोंडे, सदाशिव भोंडे, कृष्णा शिनकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *