‘स्वातंत्र्याची स्पंदने’ छायाचित्र संग्रह पुस्तक स्वरूपात – अँड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते झाले प्रकाशन

Khozmaster
2 Min Read

विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी  जिल्ह्यातील ज्ञान, अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची नव्या पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या कार्यातून कायम प्रेरणा मिळत रहावी, या उद्देशाने नीलेश देव मित्र मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या छायाचित्र संग्रहाचे ‘स्वातंत्र्यांची स्पंदने’ या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर व प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत ! स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटलली न वात !! भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी आठवल्यात तर बोटावर मोजण्याइतक्या स्वातंत्र सैनिकांच्या योगदानाची इतिहासाने दखल घेतली असल्याचे दिसून येते.देशाच्या कानाकोपऱ्यात ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी प्राणाची सैनिकांची ओळख आजच्या आहुती देणारे होते, तसे ते अकोल्यातही आहेत. या स्वातंत्र्य पिढीला व्हावी व हा ऐतिहासिक ठेवा कायम प्रेरणादायी रहावा म्हणून अकोल्यातील नीलेश देव मित्रमंडळाने काळाच्या पडद्याआड जाऊ पाहणाऱ्या अकोला जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्राचा संग्रह केला. त्यातून ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ हे छायाचित्र प्रदर्शन भरविले. आता हा छायाचित्र संग्रह स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण पुढे कायम रहावे म्हणून पुस्तक स्वरूपात संग्रहित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नाट्यकलावंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अच्युतराव देशपांडे. केशवराव ओक, विनायक गणपतराव बोराडे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून आणि जिल्हा प्रशासनाकडील यादीतून स्वातंत्र्य सैनिकांची माहिती गोळा करून स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्सिल स्केच चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे यांच्या सहकार्याने तयार केले. हाच छायाचित्रांचा संग्रह ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ या पुस्तक स्वरूपात नीलेश देव मित्रमंडळाने उपलब्ध करून दिला आहे.या पुस्तकाचे प्रकाश अॅड. प्रकाश आंबेडकर व प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, महासचिव अरुंधती सिरसाट, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, नीलेश देव यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *