आकोलखेड येथे मिलिंद प्रश्न ग्रंथाची सांगता

Khozmaster
1 Min Read

अकोट :विशाल गवई  तालुक्यातील अकोलखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ स्थित मिलिंद बौध्द पंच मंडळाच्या सभागृहात संघर्ष महिला ग्रुपच्या वतीने मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन दररोज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास ग्रंथाचे वाचन संघर्ष महिला ग्रुपच्या सदस्या सुनिता प्रभाकर नगराळे यांनी केले.’मिलींद प्रश्न’ या ग्रंथाची सांगता १० ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजता अकोला येथील भन्ते सारीपूत्र यांनी त्रिशरण,पंचशील,बावीस प्रतिज्ञा यासह बुद्ध धम्माचा उपदेश देऊन ग्रंथाचा शेवट केला.सर्वांना प्रसाद म्हणून खिरीचे वाटप करण्यात आले.यावेळी मिलिंद बौध्द पंच मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल जवादे,प्रमोद नगराळे,रतन खैरे,विजय पाटील,करुणेश मोहोड,सुरज नगराळे, साहेबराव पाटील,विनोद तोताडे,रंजित वासेकर,अमोल किटके,गौरव मोहोड,अमोल वानखडे,उमेश खैरे,सदानंद टिपले,माजी पोलीस विजय भेले, योगेश काळे, राजकुमार टिपले यांच्यासह संघर्ष महिला ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *