व्यवस्था व नियोजनाच्या बाबतीत महाराष्ट्रात एक नंबर परमहंस यात्रा कंपनी

Khozmaster
2 Min Read

अकोट प्रतिनिधी विशाल गवई अकोला येथे दत्त कॉलनी मध्ये पार पडलेल्या विचार सागर मंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करत असताना गणेश पाटील लांडे यांनी सांगितले महाराष्ट्रातून बरीच मंडळी भारत देशातील वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनीय स्थळे प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरता जात असतात आणि त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा बऱ्याच तीर्थयात्रेला गेलेलो आहे. विशेष करून तीर्थयात्रा करत असताना परमहंस यात्रा कंपनीच्या सोबत आम्ही तीर्थयात्रेला गेलो या यात्रा कंपनीचे संचालक वरुर जऊळका ता.अकोट येथील ह. भ. प.श्री गणेश महाराज शेटे असून वर्षातून वीस तीर्थयात्रेचे आयोजन करतात व प्रत्येक तीर्थयात्रेमध्ये यात्रेकरुंची व्यवस्था स्वतः लक्ष देऊन पाहतात यात्रेमध्ये सेवाधारी मंडळी, स्वयंपाक करणारी मंडळी महाराष्ट्रातील असल्यामुळे भोजनाचा आस्वाद चांगला मिळतो त्याचप्रमाणे राहण्याची व्यवस्था ,दर्शनीय स्थळे पाहायला लक्झरी बसची व्यवस्था व यात्रेदरम्यान होत. असणारा सत्संग, कथा ,कीर्तन, हरिपाठ भजन या सर्व गोष्टीमुळे यात्रेकरू मंडळी भराऊन जाते विशेष या तीर्थयात्रेमध्ये कुणाचा वाढदिवस आला तर महाराज स्वखर्चाने तो साजरा करतात मी गणेश पाटील लांडे माझ्या परिवारासह व इतर मित्रमंडळी सोबत खूप तीर्थयात्रा महाराजांच्या सोबत केल्या आणि माझ्या अनुभवास आले ,की सध्या महाराष्ट्रामध्ये नियोजन व व्यवस्थेच्या बाबतीत परमहंस यात्रा कंपनी ही एक नंबर मध्ये आहे असे प्रतिपादन अकोला येथे पार पडलेल्या विचार सागर मंचाच्या माध्यमातून गणेश पाटील लांडे यांनी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी वामनराव कवळे, दिलीप झामरे ,भगत,साबळे ,दांदळे ,भटकर,राहाणे ,परनाटे,तिवारी,राजपुत, देशमुख , सिरसाठ मंडळी उपस्थित होती.

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *