एन.सी.सी. कॅम्प मध्ये कैडेट्स ने केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

अकोला पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन यांचा दि. ४ ऑक्टोबर २०२२ पासून सी. ए. टी. सी. कॅम्प १४४ ला सुरुवात झाली असुन, ११ महाराष्ट्र बटालियनचे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्पचे आयोजन होत आहे. या कॅम्प मध्ये एकूण ३१६ एन.सी.सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला असून आठ दिवस चालणाऱ्या या कॅम्प दरम्यान त्यांना नेतृत्व, एबट्रेकल, फायरिंग तसेच त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी प्रभावशाली मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ठाकरे हॉलमध्ये एन.सी.सी. चे या कॅम्पमध्ये नेमलेल्या वेगवेगळ्या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य तसेच संगीत सादर केलेत. या कार्यक्रमानंतर कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांनी कैडेट्सला मार्गदर्शन केले. या कॅम्पसाठी एल.आर.टी. कॉलेजचे ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे लेफ्टनट डॉ. उज्वला शिरसाट, होली क्रॉस स्कूलचे चीफ ऑफिसर पराग राऊत व भारत विद्यालयाचे चीफ आफिसर संजय घोगरे यांच्या देखरेख खाली या कँपचे आयोजन करण्यात येत असून सुभेदार मेजर अशोककुमार यांच्या अंतर्गत या कॅम्पचे नियोजन होत आहे.

 

0 9 4 5 4 3
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *