देषाची अंखडता अबाधित राहावी यासाठी भारतजोडो यात्रा – जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे भारतजोडो पदयात्रेची जोरात तयारी
चिखली : 10 सप्टेंबर 2022 मलकापुर जिल्हा बुलडाणा येथे भारत जोडो पदयात्रेच्या पार्ष्वभुमीवर बुलडाणा जिल्हा कॉगं्रेस कमिटीच्या वतीने दोन दिवषीय प्रबोधन व प्रषिक्षण षिबीर, दिनांक 08 व 09 ऑक्टोंबर 2022 ला डॉ.व्हि.बी.कोलते अभियांत्रीकी महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाला सलामी देवून षिबीराला सुरूवात करण्यात आली, सदर षिबीराचे उद्घाटन आमदार राजेषजी एकडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे होते. तर प्रमुख उपस्थिीत अभाकॉ कमिटीचे सचिव मा.आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रदेष प्रषिक्षण मुख्य समन्वयक श्यामभाउ उमाळकर, प्रदेष सरचिटणीस विनायकराव देषमुख, सह समन्वयक डॉ.जितेंद्र देहाडे, बंटी पाटील, जयश्रीताई शेळके, हाजी रषिदखॉ जमादार, जिल्हा प्रषिक्षण समन्वयक प्रकाष पाटील अवचार, अॅड.हरीष रावळ, सतिष मेहेंद्रे, आदिंची उपस्थिती होती.
सकाळच्या सत्रात प्रास्तावीकपर, प्रषिक्षण षिबीराचे समन्वयक श्यामभाउ उमाळकर यांनी प्रषिक्षणाच्या आयोजना संदर्भात माहिती दिली. यावेळी आमदार राजेष एकडे म्हणाले की, देषाची एकता व अखंडता अबाधीत रहावी यासाठी कॉग्रेसनेते खासदार राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काष्मिर भारतजोडो यात्रा सुरू केली असुन या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहुन भारतीय जनता पक्ष बिथरला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.अध्यक्षीय भाषनात जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, स्वातंत्र चळवळीच्या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सन 1942 साली चलेजाव चा नारा दिला आणी अख्खा देष एकवटला होता. आता पुन्हा एकदा जुलमी मोदी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. माणसा माणसामध्ये भेद करण्याचे, विषमतेचे, व्देषाचे, राजकारण मागिल काही वर्षापासुन वाढीस लागले असुन त्याला छेद देवून एकोपा निर्माण करण्याची गरज आहे. लोकषाही संविधान धोक्यात आले आहे अषावेळी देषाच्या एकतेसाठी पुढकार घेण्याची जबाबदारी कॉग्रेस पक्षाची असून त्यासाठी भारतजोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सध्या देषातील परिस्थीती चिंतेची असुन विविधतेत एकता असलेल्या देषात आज व्देषाचे विषमतेचे बिज पेरल्या जात आहे, देषाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी सारखे प्रष्न बिकट झाले आहे, परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रष्नांकडे दुर्लक्ष करून इतर मुद्ये पुढे करीत आहे. देषाची अखंडता अबाधीत रहावी यासाठी कॉग्रेस पक्ष राहुलजी गांधी याच्या नेतृत्वाखाली भारतजोडो यात्रेच्या माध्यमातुन जनजागृती करत असल्याचे मत व्यक्त केेले.नोव्हेंबर महिन्यात बुलडाणा जिल्हयातुन भारतजोडो यात्रा जाणार असुन या पार्ष्वभुमीवर हे प्रषिक्षण षिबीर घेण्यात आले. या प्रषिक्षणाच्या माध्यामातुन भारतजोडोची माहिती गावोगावी पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले. सदर षिबीराला जिल्हयातील 150 पदाधिका-यांची उपस्थिीती होती. निरज जैन व टिमने स्वातंत्र चळवळीतील भारताचा प्राचिण इतिहास, कॉग्रेसमध्ये गांधी, नेहरू,पटेल, यांचे योगदान, आंबेडकर यांचे स्वातंत्र चळवळीचे योगदान, स्वातंत्र चळवळ, मुगल साम्राज्य, इंग्रज शासन, राष्ट्रीय स्वयंसंघाची भुमीका, इंदिराजी, राजीवजी, यांचे देषासाठी योगदान, मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, राष्ट्रीय कंपन्यांची विक्री, शैक्षणीक धोरण, महिला धोरण, आदी विषयांवर माहिती दिली.षिबीराची सांगता राष्ट्रगिताने व नफरत छोडो भारत जोडो, प्रेमसे जोडो भारत जोडो, भारत माता की जय, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचा वियज असो अषा विविध घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष बंडुभाउ चौधरी, शहर अध्यक्ष राजु पाटील, राजु जवरे, विनोद बि-हाळे, पुष्कळ कोलते, प्राचार्य अनिल खडसे, समाधान इंगळे सर, रमाकांत चौधरी सर यादींनी परिश्रम घेतले.
Users Today : 61