प्रतिनीधी रवि मगर नागसेन बुद्ध विहार चिखली येथे गेल्या तीन महिन्यांपासून वर्षावासा निमित्त ” मिलिंद प्रश्न” या धम्मग्रंथाचे वाचन( आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) मा.मुख्याध्यापक आयु.एल. आर.खरात सर करीत होते. या ग्रंथ वाचनाची सांगता दि.9 ऑक्टोबर 2022 रोजी झाली. याच कार्यक्रमात आयु.बी.जी.तायडे सर यांच्या कालकथित आई सुभद्राबाई गणाजी तायडे यांच्या जलदान विधीसाठी लागणारा खर्च टाळून त्यांनी तो कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला व त्या खर्चातून नागसेन बुद्ध विहार येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत चालविण्यात येणाऱ्या ग्रंथालयास लागणाऱ्या मौलिक ग्रंथांची खरेदी करून दान करण्यात आले. या प्रसंगी नागसेन बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयु.गुलाबराव मोरे, उपाध्यक्ष आयु.बी.बी.साळवे,संचालक आयु.सुधाकर मघाडे व संचालक मंडळ यांनी तायडे कुटुंबियांकडून ग्रंथांचा स्वीकार करून तायडे कुटुंबीयांचा या सत्कार्याबद्दल गौरव करण्यात आला. अशाच पद्धतीच्या समाजाभिमुख नवोपक्रमाची समाजाने कास धरावी यासाठी चिखली शहरातील सम्राट अशोक – फुले – आंबेडकर जयंती उत्सव समितीने पत्रकं काढून कालबाह्य रूढी – परंपराना फाटा देन्याचे आवाहन करण्यात येत आहे. जसे रक्षा विसर्जन नदीत किंवा विहिरीत टाकून प्रदूषण करण्यापेक्षा आपल्या शेतात किंवा परस बागेत पुरून मृत व्यक्तीच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यावर वृक्ष लावावे, लग्न समारंभात DJ किंवा भोजनातील अनेक पदार्थाची रेलचेल टाळून तो पैसा विद्यार्थी हितासाठी ग्रंथालयास दान द्यावा, मृत व्यक्तीच्या अंगावर नातेवाईकांकडून नविन कपड्यांचा ढीग घालून अपव्यय करण्यापेक्षा ते गरीब व्यक्तींना दान करावे,आपल्याला मुक्तीचे साधन म्हणून मिळालेला मताधिकार पैशावरी विकू नये, आपणच ठरवलेली लग्न विधीची वेळ पाळण्यात यावी इत्यादी बाबींचा विधायक विचार उत्सव समितीच्या वतीने अनेक प्रसंगी मांडण्यात येतो. आता दिवसागणिक समितीच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथवाचन समाप्तीच्या कार्यक्रमासाठी नागसेन बुद्ध विहार संचालक मंडळ, उपासक उपासिका या सर्वाचे सहकार्य लाभले.
Users Today : 61