अकोला – भारतीय डाक विभागाद्वारे दि. 9 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक टपाल दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अकोला डाक विभागाद्वारे दि. 9 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी केले आहे.
त्याअनुषंगाने अकोला डाक मंडळातील अकोला प्रधान डाकघर, मुर्तीजापुर उपडाकघर, अकोट उपडाकघर येथे प्रभातफेरीचे आयोजन करुन डाक विभागाच्या विविध योजनाचे फलक प्रदर्शित केले. तसेच डाक विभागाच्या विविध योजनाचे घोषणाव्दारे जनजागृती केली. ही प्रभात फेरी अकोला मुख्य डाकघर पासून सिटी कोतवाली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत व तेथून परत अकोला मुख्य डाकघर येथे समारोप झाला. या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येने डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिक्षक संजय आखाडे यांचेहस्ते अकोला प्रधान डाकघर येथे तर विभागीय कार्यालय अकोला येथे सहाय्यक डाक अधिक्षक सुनील एम. हिवराळे, सहाय्यक डाक अधिक्षक एन.एस.बावस्कर, तक्रार निरीक्षक तथा प्रभारी डाक निरीक्षक एस.एस.नानिर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी सर्व डाक कर्मचाऱ्यांनी डाक विभागातील आपल्या कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले.
सोमवार दिनांक 10 रोजी वित्तीय समावेशन दिवस अकोला प्रधान डाकघर येथे डायरेक्ट एजंट MPKBYव SAS एजंट्सची आढावा बैठक, प्रश्नमंजुषा कार्यक्रम व उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार, टपाल जीवन विमा पॉलीसी धारकांच्या मॅच्युरिटी दावेदारांना चेकचे वितरण आणि डब्ल्युसीटीसी अकोला येथे मुलीना नवीन सुकन्या समृद्धी खात्यांच्या पासबुकचे वितरण. मंगळवार दिनांक 11 रोजी फिलाटेली दिनानिमित्त डाक विभागातील शाळांमध्ये फिलाटेली छंद म्हणून कार्यशाळा, फिलाटेली दिनानिमित्त स्पेशल कॅन्सेलेशन चे प्रकाशन व शाळांमध्ये फिलाटेलिक क्विझ स्पर्धा. बुधवार दिनांक 12 रोजी टपाल व पार्सल दिवसानिमित्त प्रवर अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय येथे ग्राहकांची व विभागीय पोस्टमन, एबीपीएम यांच्यासोबत आढावा बैठक. गुरुवार दिनांक 13 रोजी अंत्योदय दिवसानिमित्त सहाय्यक डाक अधिक्षक यांचे द्वारे पीएमएसबीवाय, पीएमजेजेबीवाय व एपीवाय योजनांच्या संदर्भात अकोला डाक विभागात तालुका पातळीवर शिबिर, सर्व पात्र जनतेला सामाजिक सुर क्षेमध्ये कव्हर करण्यासाठी ऑटो किंवा ट्रक चालक संघटना तसेच भाजी मंडीतील कामगारांसोबत बैठक तसेच आधार नोंदणी व अपडेटिंग शिबिरांचे आयोजन. अशा कार्यक्रमांचे आयोजन जागतिक टपाल दिनानिमित्त केलेले आहे.
Users Today : 41