नवल तेजराव सिरसाट.पालघर जिल्हा प्रतिनिधी.शिवसेना पक्षप्रमुख मान. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानूसार शिवसेना नालासोपारा विधानसभा क्षेत्राची निर्धार बैठक संपन्न झाली. शिवसेना पालघर जिल्ह्याचे मार्गदर्शक माजी जिल्हाप्रमुख शिरीषदादा चव्हाण व जिल्हाप्रमुख पंकज देशमुख आणि शिवसेना भवन वरून नवनियुक्त निरीक्षक महेश धामणस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महिला आघाडी जिल्हासंघटक किरण चेंदवणकर, उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर,तालुकासंघटक प्रभा सुर्वे,तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे,उपतालुकाप्रमुख मनिष वैद्य, युवासेना जिल्हासचिव भूमिष सावे,विधानसभा युवाअधिकारी रोहन चव्हाण,शहरप्रमुख प्रदिप सावंत,उदय जाधव,संतोष टेम्बवलकर,गणेश भायदे तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी,महिला आघाडी,शिवसैनिक,युवासेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले. यावेळी संघटना बांधणी आणि सदस्य नोंदणी या विषयी शिरीषदादा चव्हाण, किरणताई चेंदवणकर आणि महेश धामणस्कर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेनेला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या मशाल निशाणीचे अनावरण करून शिवसेना मध्यवर्ती शाखेपर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली.भूमिष सावे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि बै
Users Today : 27