मुंडगाव येथे लंपी व्हायरस मुळे बैलाचा मृत्यू…….

Khozmaster
1 Min Read

पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण…..प्रतिनिधी विशाल गवई अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील शेतकरी गजानन फुशे यांच्या बैलाचा लंपी व्हायरस मुळे नुकताच मृत्यू झाल्याची घटना आज घडली….. या घटनेमुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे….. लंम्पि व्हायरस मुळे बैलाचा मृत्यू झाल्याने गजानन फुशे या शेतकऱ्यांचे अंदाजे चाळीस ते पन्नास हजाराचे नुकसान झाले असून सदर शेतकरी हा हवालदिल झाला आहे… आधीच शेतकरी नैसर्गिक आपत्ती पावसामुळे पीक उत्पादनात घट व आदीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच आता जनावरांवर आलेल्या लंपी व्हायरस मुळे जनावरे दगावत आहेत.. त्यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.. 15 ते 20 दिवसापासून औषधोपचार करण्यात आले परंतु काहीच सुधारणा होत नव्हती आणि अखेर बैलाचा मृत्यू झाला.. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत…….

दहा ते पंधरा दिवसा पासून माझा बैल आजारी होता त्याला लम्पि वायरस ची लागण झाली होती आज अखेर माझ्या बैलाचा मृत्यू झाला .. शासनाने त्वरित मदत करावी

गजानन फुशे शेतकरी

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *