बुलढाणा योगेश नागोलकार राहेर/जिल्ह्यातील राहेर शेतातून घेतले होते ताब्यात मागील काही दिवसांपासून पातुर व लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात दर्शन देणाऱ्या बिबट्याला शनिवारी 8 ऑक्टोबरला आलेगाव वनविभाग रेस्क्यू टीमने ताब्यात घेतले होते. मात्र रविवारी 9 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून पातुर तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्याचे दर्शन घडत असल्याचे वृत्त येत होते. दरम्यान शनिवारी आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाला पातूर लगत राहेर शेतशिवारात जे बुलढाणा वनविभागात येते त्या ठिकाणी बिबट असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आलेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण, रेस्क्यू टीमचे सदस्य वनरक्षक लखन खोकड, पराते ओलवे पाटील ,भागवत शेलार, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, आलेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी राऊत आदींनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याला उपचारार्थ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय चिकीत्सालयात रविवारच्या पाहटे तीन ते चार दरम्यान दाखल केले होते.मात्र रविवारी 9 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या शरीरावर जखमा हा बिबट वयस्कर होता. त्याच्या अंगावर दुसऱ्या कुठल्या बिबट वा तत्सम जनावरांशी युद्ध झाल्यासारख्या जखमा होत्या. तो उपाशी व अश्वस्थ दिसून येत होता. तसेच त्याला निमोनिया झाल्याचे डॉक्टरांचे मत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्यावर कायद्यानुसार पंचनामा करून इतर विधी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
Users Today : 4