सोलापुर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सोलापुर शहरातील रहिवासी असलेल्या सौ. लता विलासराव महिंद्रकर यांचे रविवार दिनांक ९ अॉक्टोबर रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. सोलापुर तालुका आणि परिसरात अत्यंत शिस्तबद्ध सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावामुळे त्यांना सर्व लोक आपले मानत असत. उच्च विचारांच्या त्या पुरस्कर्त्या होेत्या. अत्यंत सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित परिवार म्हणुन त्यांनी आपल्या परिवाराची ओळख निर्माण केली होती. अत्यंत हलाखीच्या आणि गरीब परिस्थितीतुन त्यांनी मुलांना घडविले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष श्री. विनायक विलासराव महिंद्रकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा श्री. विनायक महिंद्रकर यांच्यासह पती श्री. विलासराव काशिनाथराव महिंद्रकर, एक मुलगी सौ. विद्या देवराज फुटाणकर तसेच जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सोलापुर शहरात व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रियाविधी सोमवार दिनांक १७ अॉक्टोबर रोजी सोलापुर शहरातील गणपती घाट येथे सकाळी ७ : ३० वाजता होणार आहे.
मा. संपादक वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती स्व. लता विलासराव महिंद्रकर