अकोट प्रतिनिधी विशाल गवई वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाध्यक्ष रेखाताई ठाकुर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुक्यातील ढगफुटीसदृश पावसाने केलेल्या नुकसाना संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनाव्दारे तात्काळ सर्वे करून सरसकट नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानूर,मलकापूर गोंड, मलकापूर,भिली,केलपानी,गुल्लरघाट,दहिखेड,फुटकर,शिवपूर,कासोद, बोर्डी,उमरा,जितापुर,अकोलखेड ,मोहाळा,अडगाव खुर्द,दाऊतपूर, मलकापूर,कातखेड नेव्हरी बु ,नेव्हरी खु., जळगाव नहाटे,वणी वारुळा,आलेगाव,लोहारी,मुंडगाव गावांसह संपूर्ण तालुक्यात सोमवारी व मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. व काही गावातील पिके व शेतजमीन हि वाहुन गेली आहे. तसेच या ढगफुटीसदृश पावसाने घरांची पडझड झाल्याने गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने नुकसान ग्रस्त भागातील घरांची व शेतीची तात्काळ सर्वे करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने वतीने केली, उपविभागीय अधिकारी अकोट यांना केली आहे. अकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात सोयाबीन पिके काढणीला आले. असतांना परतीच्या पावसाने सोमवारी व मंगळवारी ढगफुटीसदृश पावसाने कहर केला. त्यामुळे अनेक घरांसह शेतात पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजावर न भरणारा घाव बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त गावांचा तात्काळ सर्वे करून सरसकट नुकसान भरपाई हि दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.अशी मागणी बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्यासह महासचिव रोशन फुंडकर, संघटक सुरेंद्र औंईबे, कोषाध्यक्ष निलेश झाडे,या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी दिपक बोडके,धिरज सिरसाठ, मनोहर शेळके, सुभाष तेलगोटे, मयुर सपकाळ,शरीफ राणा, शिवदास बुटे, डॉ.अनिल गणगणे, माणिक इंगळे, निशांत राठोड, मुश्ताक पटेल, मंगेश कांबळे, नंदकिशोर मापारी, नितीन वानखडे, रोहित धांडे, दिनेश सरकटे, सुनिल घनबादूर, निलेश सरकटे, विनायक भरक्षे, अक्षय तेलगोटे, योगेश आग्रे, युवराज मुरकुटे, दिनेश धांडे,अतूल अढाऊ, विशाल तेलगोटे, संतोष इंगळे, निरंजन गावंडे, अनिल राऊत, प्रमोद सोनोने,लखन इंगळे,विकी तेलगोटे, सदानंद तेलगोटे, रामकृष्ण मिसाळ,जमु पटेल, दिपक फुंडकर, सागर आग्रे, सुदर्शन किरडे, महिला अध्यक्षा सुनिताताई हिरोळे,राधाताई प्रल्हाद काळे, मंदाताई कोल्हे,शिलाताई वानखडे, शोभाताई शेळके, लताताई कांबळे, मिराताई तायडे,हिवराळे यांच्या सह बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी कार्यकर्ते उपस्थिती होते.शेतकऱ्यांना दिवाळी च्या आधी नुकसान भरपाई नाही मिळाली तर अन्यथा दिवाळीच्या दिवशी शासनाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे.
Users Today : 0