मेहकर :- तालुक्यातील मोळी गावातील जातीयवादी गावगुंडांनी तोरणाखाली महाराचा बैल चालणार नाही .असे म्हणत गावातील माजलेले गांवगुडं यांनी संगनमताने बौद्ध समाजाचे वयवृध्द श्रीधर वानखेडे यांनी बेदम काठ्यांनी व दगडांनी अमानुष मारहाण करण्यात आली . तुम्ही महाराहो याला दवाखान्यात कसे नेता तुम्हाला एका एकाला कापले पाहीजे तुम्ही जातीने महार असुन तुम्ही पाटलाच्या तोरणाखाली कसा बैल आनला आम्ही पाटालनी कुठे बैल उभे करायचे असे म्हणत बेदम मारहाण केली शिवप्रसाद नागरीक ,राम नागरीक ,या दोघांनी वयस्कर व्यक्तीला जनावारापेक्षाही भयानक मारहाण केली. येवढे असुनही पोलीसांनी रीपोर्ट घेण्यास टाळाटाळ करीत बऱ्याच वेळ पोलीसांनी टात्काळत उभे ठेवले रात्री उशीरा रीपोर्ट घेऊन अद्याप आरोपी पोलिसांच्या पुण्याईने मोकाट फिरत आहे .अन्याय ग्रस्तांना कधीं न्याय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .व समाजात भितीचे वातावरण दिसुन आले.स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवाला असा हल्ला होणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान झाल्यासारखे आहे .
Users Today : 22