शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या! सचिन शिंदे

Khozmaster
1 Min Read

अकोट प्रतिनिधी विशाल गवई सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान..!अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी सलग दोन-तीन दिवस ढग फुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील पोपटखेड, शहानुर जंगल ,मलकापूर, दहिखेळ ,फुटकर, अकोलखेड ,आंबोळा, बोर्डी, शिवपुर, कासोद, राणापुर ,रामापुर, पिंपरी खुर्द ,पिंपरी जैन, उमरा, शहापूर, जीतापूर सह अकोट परिसरातील नदी आणि नाल्याच्या काठावरील शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास सोयाबीन कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हातबल झाला ,असून शेतकऱ्यांना तातडीने सर्वे करून सरसकट मदतीची त्वरित आवश्यकता आहे .काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी शासनाने सहानुभूतीपूर्वक मदतीचा हात द्यावा व बळीराजाची दिवाळी गोड करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा अकोला अकोटच्या वतीने तहसीलदार निलेश मडके यांना देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे तालुका अध्यक्ष कुणाल कुलट जिल्हा संपर्क प्रमुख राजीव खारोडे शहर प्रमुख प्रणव चोरे , निखिल कुलट, बच्चू पाटील, भगत ,अक्षय डेरे, संतोष पुंडकर, विठ्ठल मोहोकार ,सागर मार्के ,शिवा गीते हे उपस्थित होते.

0 9 4 7 6 3
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *