योगेश नागोलकार पातूर कापून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने मोठे नुकसान तालुक्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे आधीच कमकुवत बनलेल्या सोयाबीन पिकाला दि ५ बुधवार पासून परतीच्या पावसाने कुठे अतिवृष्टी सदृश तर कुठे मुसळधार पावसाने झोडपून काढले.त्यामुळे काढणीस आलेल्या व शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन पावसाने भिजल्याने तर गंजी लावलेल्या सोयाबीन मध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.पातूर तालुक्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टी सदृश तर कुठे ढगफुटी पावसाने कहर करून शेतकऱ्यांना वेठीस धरून मोठे नुकसान केले.या वर्षी चांगले भरघोष उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी २८,७३७ हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली तसेच ४,८१९ हेक्टर क्षेत्रामध्ये कपाशी तर ४८४० हेक्टर क्षेत्रामध्ये तूर तसेच १०७७ हेक्टर क्षेत्रामध्ये मूग तर ९३९ हेक्टर क्षेत्रामध्ये उडीद पिकाची पेरणी केली होती.परंतु सततच्या पावसामुळे उडीद मुगाचे पीक हातातून गेले. सोयाबीन पिकावर मदार असलेला शेतकरी सोयाबीन पिकाची कापणी करीत असतांना पुन्हा परतीच्या पावसाने तालुक्यामध्ये दि ५ बुधवार पासून कुठे अतिवृष्टी सदृश तर कुठे ढगफुटी सारखा पाऊस पडून शेतकऱ्यांची धांदल उडवून देऊन शेतकऱ्यांनी शेतामध्ये कापून ठेवलेल्या व गंजी लावलेल्या सोयाबीनला ओले केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे आलेगाव,गावंडगाव,पहाडसिंगी,चिंचखेडा,पिंपळडोळी,कार्ला,शेकापूर,गोळेगाव, डोलारखेड,शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले.काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी केली असून गरज भागविण्यासाठी बाजारामध्ये ३५०० ते ३७०० पडेल दराने सोयाबीनची विक्री केल्याचे सांगितले.जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान होऊन संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष करीत सर्व्हेक्षण केले नाही.सोयाबीन काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने हजेरी लावून मोठे आर्थिक नुकसान केले तरी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. बाळकृष्ण देवकते शेतकरी गावंडगाव परतीच्या ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.तसेच गत जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊन शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदती पासून वंचित ठेवले.शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी आर्थिक मदत द्यावीअनिकेत अ राठोड गावंडगाव कृषी पदवीधर उत्पन्नामध्ये कमालीची घट सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट होऊन एकरी तीन चार क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांना येत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाल्याने रब्बी पीक पेरणी कशी करावी व प्रपंचाचा खर्च कसा भागवावा ही चिंता शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे.शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारामध्ये मिळत असलेला पडेल दर लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्यावी
विजय बोचरे आलेगाव ऑर्गनिक शेतकरी
Users Today : 3