ईद मिलादुन्नबीनिमित्त आ सौ श्वेता ताई महाले यांच्या वतीने पुष्प वृष्ठी

Khozmaster
2 Min Read

चिखली: मुस्लिम समाजाचे दैवत हजरत मोहम्मद पैगंबर यांची इद-ए-मिलादुन्नबी चिखली शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमसह निघालेल्या भव्य मिरवणूकीवर आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पुष्प वृष्टी करुन हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श निर्माण केला आहे.         सदर मिरवणुक बाबु लॉज चौक येथून सुरवात झाली होती. दोन वर्षानंतर इद ए मिलादुन्नवीचा कार्यक्रम होत असल्याने मुस्लीम बांधवामध्ये मोठा उत्साह होता. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पंडीत दादा देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच शिवराज भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस शेख बुढन यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी नागरिकांच्या चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती.हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी इद मिलादुन्नबी मोठया उत्सवात साजरी करण्यात येते . मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे मिरवणुक काढल्यात आली नव्हती. परंतु या वर्षी सर्व सण मोठ्या उत्सा साजरे होत असल्याने १० ऑक्टोबर रोजी चिखली शहरातुन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. मोहम्मद पैगंबर यांना मानवता वादी समाज निर्मिती साठी प्रयत्न व्हावे आ. सौ . श्वेता ताई महाले पाटील हजरत मोहमद पैगंबर यांचे विचार हे जातीभेदाला मूठमाती देऊन मानवाला मानुसच म्हणून जगण्याची प्रेरणा देतात . समस्त मानव जात एकच असल्याची शिकवण देऊन मानवता हिच खरी इस्लामची जीवन पद्धत असल्याचे सांगतात . हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचा आदर करून त्यांना अभिप्रेत असलेला समाज निर्मातीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे असे प्रतिपादन आ.सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी शुभेच्छा देताना केलें.       यावेळी शिवराज पाटील, ॲड मंगेश व्यवहारे, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य, अंकुश राव पाटील,अनमोल ढोरे पाटील, चेतन देशमुख, ॲड संजय सदार, हरीभाऊ परिहार, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, विजय नकवाल, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..

 

0 9 4 6 5 4
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *