अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. नुकसान ग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यातुन सुटणार नाही याची दक्षता घ्यावी.

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा मा.ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री बुलढाणा जिल्हा यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश  दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हयात सर्वदुर पाऊस झाला असून मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात 107 मि.मी. आणि नायगांव मंडळात 107 मि.मी. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात 105 मि.मी. पाऊस झाला. सदर अतिवृष्टीमुळे हया दोन तालुक्यात अंदाजे 19065 हे.आर शेतीपीकाचे नुकसान झाले आहे. हयाबाबतची माहिती मिळताच मा. पालकमंत्री ना.श्री गुलाबराव पाटील हयांनी जिल्हाधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घेऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सदर पंचनामे करतांना नुकसान ग्रस्त एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. हयावेळी मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री संजय रायमुलकर हे सुध्दा मंत्री महोदयांसमवेत उपस्थित होते.  सद्यस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पीकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

0 9 4 6 5 4
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *