चिखली आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील हिंदू धर्मात दिवाळी दसऱ्या इतकेच कोजागिरी पौर्णिमेला महत्व आहे.दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सोसायटीतील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं साजरं रुप आणि टपोरं चांदणं पाहायला मिळत असतं. कोजागिरीला सर्व जण रात्री बारा वाजेपर्यंत जागुन ही पौर्णिमा साजरी करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे. खीरीमध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता अधिक असते असं मानलं जातं. या दिवशी चांदण्यांसोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासाठी चंद्राच्या शातल प्रकाशात ठेवलेली खीर आरोग्यसाठी लाभदायक असते. कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असे मानले जाते. यासाठी हा दिवस धन प्राप्तीच्या दृष्टीने आणि घरात समृद्धी येण्यासाठी खूपच चांगला समजला जातो. कोजागिरी पौर्णिमा आणि देवी लक्ष्मी दोघेही उज्ज्वल आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासाठी या रात्री जागून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असतो असे म्हणतात, म्हणून या दिवशी चंद्राचा प्रकाश अन्य दिवसांपेक्षा अधिक लख्ख असतो. याच्या शीतलतेमुळे चांगले आरोग्य लाभते अशी मान्यता असल्याने माझ्या मतदार संघातील नागरिकांना कोजागिरी पौर्णिमा चांगल्या आरोग्यासोबतच सुख समृध्दी घेउन येईल अशी प्रार्थना आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने केली. 
दि 9/10/2022 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल चिखली येथे भारतीय जनता पक्षाचे वतीने शहर अध्यक्ष पंडीत दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून भव्य कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या . 
यावेळी सतीशजी गुप्त अध्यक्ष चिखली अर्बन बँक, सुरेंद्र जी पांडे,शिवराज पाटील, ॲड मंगेश व्यवहारे, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य, सलीम मेमन, भाईजान,अंकुश राव पाटील,अनमोल ढोरे पाटील, चेतन देशमुख, ॲड संजय सदार, हरीभाऊ परिहार, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, विजय नकवाल, सुभाष अप्पा झगडे,सचिन कोकाटे, , युवराज भुसारी, महेश लोणकर,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..
Users Today : 4