आकोलखेड सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रभाकरराव नगराळे दोन मतदारसंघातून विजयी

Khozmaster
1 Min Read

सोसायटीच्या अध्यक्षपदी दादाराव तायडे तर उपाध्यक्षपदी गजानन ताडे                                  अकोट :विशाल गवई तालुक्यातील आकोलखेड सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या निवडणूकीत १३ सदस्यीय संचालक मंडळात सोसायटी स्थापन झाली त्यावेळेस पासून इतिहासात पहिल्यांदाच प्रभाकरराव नगराळे हे अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग मतदारसंघ व कर्जदार मतदारसंघ या दोन मतदारसंघातून विजयी झाले होते.त्यापैकी अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग मतदारसंघातून त्यांनी राजीनामा दिला.१२ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आले त्यामध्ये ११ सदस्यांची उपस्थिती होती.अध्यक्षपदी मागासवर्गीय उमेदवार दिल्याने प्रभाकरराव नगराळे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत दादाराव तायडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी गजानन ताडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली.सोसायटीचे संचालक म्हणून महेंद्र मुऱ्हेकार,शेख हुसेन शेख कदीर, नंदकिशोर चौरागडे, संतोष वडसिंगे,आशा ओंकारराव टवलारे,मिना बजरंग तळोकार,गोपाल कावरे, गोविंद शिवरकार आदींची उपस्थिती होती.निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून डी.डब्ल्यू.सिरसाट यांनी निवडणूकीचे कामकाज व्यवस्थित पार पाडले.त्यांना सेवा सहकारी सोसायटीचे सचिव मिर्झा यांनी सहकार्य केले.

 

0 9 4 7 6 3
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *