पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

Khozmaster
2 Min Read

आ.सौ. श्वेता ताई महाले पाटील बुलडाणा ÷ मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्यानंतर काढणीच्या वेळीच सप्टेंबर पासुन जोरदार पाऊस सुरू झाल्याने चिखली आणि बुलडाणा तालुक्यात शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. . कुठे ढगफुटी सारखा तर कुठे कमी पण सततच्या पाऊस पडून पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबिनला कोंब फुटत आहे. उभी पिके सडत आहे . त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.          दि 11/10/2022 रोजी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गणपती मध्ये पाऊस सुरू झाला. संपूर्ण पितृ पक्षात सुद्धा पाऊस पडला . नवरात्र जरा कोरडे गेले असले तरी ऑक्टोंबर महिन्यात पावसाने अधिक जोर धरलाआहे. गत तीन चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे . मागील महिन्यात धाड, मासरुल , रायपूर मंडळात पासून झाला आज दि 11/10/2022 रोजी हिवरा नाईक, किन्ही नाईक ईसोलि या भागात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झालेले आहे . तसेच चिखली व बुलडाणा तालुक्यात अजूनही मुसळधार पावसामुळे नदी नाले एक होऊन शेती जलमय झालेल्या आहे. परंतु प्रशासन 65 मिलिमीटर पासुन पडला नसल्याचे सांगून पंचनामे करणे टाळत आहे . नदी नाल्या काढची पीके तर जमिनीवर पडली . वरून पावसाचा मारा असल्याने पिके सडत आहे. परंतु अजूनही पंचनामे नसल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पाऊस तर पिच्छा सोडत नाही. हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेत आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा शिवसेना युती सरकारने NDRF चे मदतीच्या निकषात बदल केला . आर्थीक मदत दोन हेक्टर वरून तीन हेक्टर केली . आर्थिक मदतीत वाढ केली . परंतु प्रशासन अजूनही पंचनामे करण्यास ही टाळाटाळ करीत आहे. त्यामूळे सततचा पाऊस पडुन झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

 

0 9 4 6 5 4
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *