जीवनावश्यक वस्तू वाटपाचे नोव्हेंबर महिन्यासाठी परिमाण निश्चित

Khozmaster
1 Min Read

मुर्तिजापुर – जिल्ह्याकरीता माहे नोव्हेंबर महिन्यासाठी लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती,दर दोन रुपये प्रति किलो तसेच तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रति किलो. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत गहू- 15 किलो प्रति दोन रुपये दराने मिळतील. तांदूळ- 20 किलो प्रति कार्ड, तीन रुपये प्रति किलो. नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांना लहानमोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार एक किलो प्रति शिधापत्रिका, 20 रुपये प्रतिकिलो.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ (मोफत) आणि अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह एक किलो गहू, चार किलो तांदूळ (मोफत) वाटप होणार आहे. हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

0 9 4 7 6 3
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *