अकोला – पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाचा अडीच वर्षाचा कालावधी पुर्ण झाला असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार या पदाची निवडणूककरीता रविवार दि. 16 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता विशेष सभा संबधित तालुक्यातील पंचायत समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवडणूकीकरीता पीठासीन अधिकारी म्हणून संबधित तालुक्यातील तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्र दि. 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत पिठासीन अधिकारी, अकोला यांचेकडे संबधीत तालुक्यातील पंचायत समिती सभागृहामध्ये स्विकारण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.
Users Today : 12