अकोट तहसीलदार तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन…….
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट तालुक्यात सलग दोन तीन दिवसा पासून ढग फुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने अकोट तालुक्या सह मुंडगाव परिसरातील अल्यारपूर. नायनापूर. अमीनपूर. खेर्डा. सोनंबर्डी. वणी.खानापूर.व आदी शिवारात व नदी आणि नाल्याचा काठावरील शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास सोयाबीन, कपाशी, पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला, असून शेतकऱ्यांच्या पिंकाचा तातडीने सर्वे करून सरसकट मदत त्वरित करण्यात यावी, काही दिवसावरच दिवाळी येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . तरी शासनाने सहानभूती पूर्वक मदतीचा हात द्यावा व बळीराजाची दिवाळी गोड करावी अशा आशयाचे निवेदन विजय ढोरे. अशोक बेलसरे. प्रशांत आकोते. राहुल भेले. विलास बहादुरे. छगन आंबळकर. मयूर फुशे. प्रवीण रोठे. साहिल गणगणे. कांचन भिरडे व आदींनी
तहसीलदार कार्यालय अकोट यांना निवेदन देण्यात आले.
Users Today : 5