शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या …… प्रमोद सोनोने 

Khozmaster
1 Min Read

अकोट प्रतिनिधी विशाल गवई शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या …… प्रमोद सोनोनेअडगाव खुर्द येथील मोठ्या प्रमाणत शेतकऱ्याचे नुकसान अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी सलग दोन तीन दिवस ढग फुटी सादृश्य पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील पिंप्री खुर्द,पिंप्री जैन, एदलापुर, चोरवड बु. खैरखेड, उमरा, बेलुरा, शहापूर, जीतापुर माऊली, जितापुर रूपागड, लाडेगाव, मक्रमपुर, अडगाव खुर्द,दाऊतपूर, मलकापूर,ग्याजुद्दीन नगर,कातखेड सह अकोट परिसरातील नदी आणि नाल्याचा काठावरील शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास सोयाबीन, कपाशी, तशेच केळी, संत्रा, पपई निंबु, व भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला, असून शेतकऱ्यांना तातडीने सर्वे करून सरसकट मदत त्वरित करण्यात यावी, काही दिवसावरच दिवाळी येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी शासनाने सहानुभूती पूर्वक मदतीचा हात द्यावा व बळीराजाची दिवाळी गोड करावी अशा आशयाचे निवेदन ज्ञानेश्वर वैराळे, सोपान साबळे, भास्कर साबळे, राजेश वरोकार, प्रकाश गिते, संदिप वरोकार, पुष्पा गिते, सुनंदा गिते, श्रीकांत वैराळे, प्रवीण साबळे ,सुरेंद्र साबळे, गोपाल साबळे, उद्धव साबळे, विनायक साबळे, गोवर्धन साबळे, रमेश साबळे, संदीप साबळे,राजु श्रीखंडे, विठ्ठल वैराळे, संजय साबळे, तुळशीदास साबळे, प्रमोद सोनोने,मधूकर कुटे, त्र्यंबक साबळे, गजानन वानखेडे, पंढरीनाथ सिरस्कार,अजमत शाहा, अमोल पटके,नंदु धर्म, संजय गवई, अहेमद शाहा, भगवान वानखडे, विजय तायडे, वासुदेव सिरस्कार मधुकर सोनोने, संतोष सोनोने यांच्या वतीने तहसीलदार निलेश मडके यांना देण्यात आले.

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *