सिनखेडराजा प्रतिनिधी 10 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा करण्यात आला तसेच 17 तारखेपर्यंत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्य सर्वांसाठी वैश्विक प्राथमिकता या ब्रीदवाक्यखाली समाजामध्ये जनजागृती करण्याचं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने मान्य अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी सर यांच्या अध्यक्षतेखाली मानसिक व सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले सदरील दिवशी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथील प्रमिला दीदी यांनी उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थी यांना मानसिक आरोग्य कसे चांगले राखावे याबद्दल मार्गदर्शन केलं त्यानंतर विजन नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले डॉक्टर कोणाले शेवाळे मानसोपचार तज्ञ यांनी प्रस्तावना केली तसेच डॉक्टर विश्वास खर्चे यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच ब्रीदवाक्य याबद्दल सखोल माहिती दिली जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी यांनी मी पागल नाही आजारी आहे या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सदरील पथनाट्याला अनुसरून डॉक्टर बाहेकर यांनी मानसिक आजाराचे प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत उपचार पद्धती कशा पद्धतीने पोहोचल्या व दिल्या जातात याबद्दल माहिती दिली डॉक्टर लता भोसले यांनी तंबाखू आरोग्यासाठी किती हानिकारक आहे व तिचे सेवन कसे सोडावे याबद्दल माहिती देऊन प्रत्येक शाळेमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येते याबद्दल माहिती दिली माननीय अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये मानसिक आरोग्य याबद्दल माहिती देत असताना ज्याचे मानसिक आरोग्य चांगले त्याचे कामही चांगले आणि सहकर्मचारी यांच्यासोबत संबंधही चांगले ज्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले आहे त्याला जॉब साठी स्पेशल पण चांगले मिळते जो आपल्या कामाशी प्रामाणिक आहे त्याला मानसिक आजार होऊ शकत नाही अशी ग्वाही देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूनम क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सिद्धार्थ जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता श्री दीपक नरवडे आणि भालचंद्र राऊत यांनी प्रयत्न केले सदरील कार्यक्रमाला जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या श्रीमती खेडेकर मॅडम व विखे मॅडम उपस्थित होत्या
Users Today : 4