चिखली: गेल्या दशकोत्तर काळापासून सातत्याने साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांस्तव बहुचर्चित असलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित दि. २०-११-२०२२ रोजी होऊ घातलेल्या बहुजन साहित्य संमेलनासाठी संघाचे सन्माननीय पदाधिकारी आयुष्मान डी. व्ही. खरात सर यांनी आज महाराजा अग्रसेन रिसाॅर्ट चिखलीचे मालक तथा आपल्या मानवीय सेवाभाव,सामाजिक सदभाव तसेच दानशूर मनोधारणेमुळे महाराष्ट्रासह ईतर राज्यातही गाजत असलेल्या उज्जैनकर फाऊंडेशन,मुक्ताई नगर तर्फे दिल्ली येथील सोहळ्यात प्रदान झालेल्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आयुष्मान अशोक अग्रवाल यांच्या हस्ते स्वेच्छेने योगदान, संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्या कडे, संमेलनाच्या नियोजित स्थळी सुपूर्द केले. विशेष म्हणजे या अगोदरंच संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा फुले-आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते आयुष्मान डॉ. आर. पी. गवई सरांनी सुध्दा आपल्या तर्फे स्वेच्छापूर्वक योगदान संमेलन सोहळ्यासाठी प्रदान केले असल्याचे संयोजकांनी निवेदन केले. तसेच ब. सा. संघाच्या सदस्यांना आपल्या सामाजिक बांधिलकी व योगदानाच्या जबाबदारीची आंतरिक जाणीव असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
Users Today : 4