स्थानिक आदर्श विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे अर्धवार्षिक आढावा बैठक सपन्न

Khozmaster
3 Min Read

चिखली स्थानिक आदर्श विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे अर्धवार्षिक आढावा बैठक सपन्न शाळेच्या दैनंदिन कामकाजामध्ये व शालेय व सहशालेय उपक्रमा मध्ये शिक्षक हा गुंतलेला असतो परंतु काम करत असताना आपण केलेल्या कामाची नोंद ही थोडी उशिरा घेतो या उशीरा घेतलेल्या घेतलेल्या नोंदीमुळे गोंधळ निर्माण होतो हा गोंधळ होऊ नये व वार्षीक अहवाल देतांना मागील अर्धवार्षीक बैठकीचा शिक्षकांना आपल्या कार्याचा आढावा घेता येतो या अनुषंगाने शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे दि.११/१०/२०२२ वार मंगळवारला प्रभात विभागाची अर्धवार्षीक आढावा बैठक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.रामकृष्णदादा शेटे* यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली व दि.१३/१०/२०२२ वार गुरुवारला माध्यामिक विभाग आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. प्रेमराजजी भाला यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श विद्यालयामध्ये अर्धवार्षिक आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीचे माध्यामिक विभाग प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री.रमेश जाधवसरांनी केले..व प्रभात विभागाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री.गणेश नालिंदे सरांनी केले या महत्वपुर्ण अर्धवार्षिक आढावा बैठकीमध्ये सर्व शिक्षकांकडून आपल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला यामध्ये आपला वर्ग,पालक संपर्क, पालक मेळावे, अभ्यासक्रम, फीडबॅक नोंद, शालेय उपक्रम,मातापालक मेळावे,जयंत्या,क्रीडा खेळ व विकास,विज्ञान प्रयोगशाळा,विद्यार्थी विकास मंडळ,शिष्यवृत्ती परिक्षा तथा शिष्यवृत्ती फाॅर्म भरणे त्याचा मागोबा व शाळा प्रवेश,प्राविण्य वर्ग,परिक्षा पध्दती नियोजन त्याचबरोबर नाविन्यपूर्ण शिक्षण शाळासिध्दी या महत्वपुर्ण विययावर प्रत्येक शिक्षकांनी आपले वैयक्तिक लेखी तथा तोंडीअहवाल सादर केले. या अहवाला सादरी करणामध्ये शिक्षकांना -पालक शिक्षक आणि शाळा समाज माध्याम माजी विद्यार्थी माजी कर्मचारी यांचा सहभाग घेऊन शाळेची प्रगती कशी साधता येईल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे व विद्यार्थी हे दैवतआहे याचे चिंतन करत आपण विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांना मदत करावी व त्यांच्या कलागुणांना ओळखुन त्यांना प्रोत्साहन द्यावे व वृंदीगत करावे. आपल्या शिक्षकांनी विद्यार्थी प्रिय शिक्षक व समाजप्रिय शिक्षक व्हावे असे मार्गदर्शन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री प्रेमराजजी भाला यांनी मार्गदर्शन केले.  या अर्धवार्षीक आढावा बैठकीला उपस्थीत आदर्श विद्यालयाचे प्राचार्य श्री. समाधान शेळके सर उपप्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे सर, पर्यवेक्षक श्री रमेश जाधव सर,पर्यवेक्षक श्री गणेश नालींदे सर तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षिकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. प्राचार्य श्री. समाधान शेळके यांनी केले व शिक्षकांकडून हमी व ग्वाही देत प्रत्येक कार्य आम्ही प्रामाणिकपणे करु व शाळेच्या प्रगतीसाठी अतोनात प्रयत्न करु आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विषयशिक्षक व वर्गशिक्षक या नात्याने वर्गाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे लक्ष देऊ असे प्रतिपादन व्यक्त केले.या अर्धवार्षीक आढावा बैठकीचे आभारप्रर्दशन मा.उपप्राचार्य श्री.प्रमोद ठोंबरे सरांनी व्यक्त केले …

0 9 4 6 5 4
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *