वारकरी भवन अंदाजे २.५० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार ; भूमिपूजन सोहळा संपन्न

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून बुलढाणा शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिले आणि भव्य दिव्य असे वारकरी भवन अंदाजे २.५० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार असून त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला….!           !! जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा!!      आज दिनांक १३/१०/२०२२ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या भगीरथ प्रयत्नातून संतभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात वारकऱ्यांच्या सोयीसुविधेकरिता वारकऱ्यांच्या मागणीनुसार व माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यातून २ कोटी ५० लक्ष रुपयाचे भव्य वारकरी भवन उभारण्याचा संकल्प केला आहे, त्या भवनांचा भूमिपूजन सोहळा आज रोजी संपन्न झाला…!वृंदावन उमाशक्ती पिठाचे शंकराचार्य श्री श्री श्री रामदेवानंदजी सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली तसेच *बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड* यांच्यासह नाशिक येथील आचार्य मठाधिपती श्री डॉ रामकृष्ण महाराज लवहितकर, आळंदी देवाची अध्यक्ष वारकरी भवन मुंबई येथील श्री ह.भ.प रामेश्वर महाराज शास्त्री,जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज अध्यक्ष देहू संस्थान श्री ह.भ.प नितीन महाराज मोरे, हिंदधर्मप्रचारक हिंदूभूषण दिल्ली येथील श्री ह भ प श्यामजी महाराज, पसायदान सदन पंढरपूर येथील श्री ह.भ.प बाबुराव महाराज वाघ, गीता आश्रम पळसखेड सपकाळ येथील श्री ह.भ.प स्वामी हरि चैतन्यनंदजी महाराज, विश्वस्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील श्री ह.भ.प प्रकाशबुवा जंजाळ, एलोरा संस्थान येथील अध्यक्ष श्री ह.भ.प तुकाराम महाराज सखारामपुरकर, अध्यात्मिक आघाडी शिववारकरी सेना तथा विदर्भ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ श्री. ह.भ.प राजेंद्र महाराज तळेकर, वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष ह.भ.प दामूअण्णा महाराज शिंगणे, भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री ह.भ.प सिताराम महाराज ठोकळ, श्री ह.भ.प योगी अमोलानंद महाराज, श्री ह.भ.प डॉ विकासजी बाहेकर या सर्वांच्या शुभहस्ते बुलढाणा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमागील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या प्रशस्त प्रांगणामध्ये संपन्न झाला…..!यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, शिवसेना नेते संदीप गायकवाड, शिवसेना माजी शहरप्रमुख श्री मुन्नाजी बेंडवाल, धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,शिवसेना महिला शहरप्रमुख वैशाली ठाकरे,तथा सन्मानिय नगरसेवक श्री आशिष जाधव, श्री विजय जायभाये, श्री दीपक सोनुने, श्री बाळासाहेब धुड,श्री उमेश कापुरे,श्री मोहन पऱ्हाड, श्री उदय देशपांडे, श्री गोविंदा खुमकर, श्री रमेश गायकवाड, श्री रामेश्वर वावरे, श्री मंदार बाहेकर,श्री आकाश दळवी, श्री अरविंद होंडे, श्री कैलास माळी, यांच्यासह बुलडाणा शहरातील समस्त नागरिक तथा शिवसेना, युवासेना पदाधिकारी तथा सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होते….!

 

0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *