मूर्तिजापूर – दर्यापूर रोडवरील पुंडलिक नगर सिरसो जवळ बोलेरो मालवाहू गाडीने दुचाकीस जबर धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहीतीनुसार कारंजा येथील आकाश लाजुरे हे दर्यापूर न्यायालयात लिपीक पदावर कार्यरत होते आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या कर्तव्यावर मुर्तिजापूर येथील आशिष इचे हे सुध्दा न्यायालयात कार्यरत आहेत त्यामुळे दोघेही एम एच ३० बी एन २५५५ क्रमांकांच्या दुचाकीने मूर्तिजापूर वरून दर्यापूरला आपल्या कर्तव्याकर जात असताना पुंडलीक नगर सिरसो जवळ दर्यापूर कडून येणाऱ्या बोलेरो मालवाहू गाडी क्रमांक एम एच १६ ए वाय ६५७९ या गाडीचा मागील टायर फुटल्याने गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून दुचाकीला जबर धडक दिल्याचा अपघात झाल्याची माहीती आमदार हरिष पिपंळे व्दारा संचालीत जय गजानन आपात्कालीन पथकाचे सेनापती सेवतकर व रुग्नसेवक तथा माजी नगरसेवक सुनिल लछुवानी यांना मिळाली असता आपल्या पथ सदस्यासह तात्काळ रुग्नवाहीका घेऊन घटना स्थळी दाखल झाले आणि जखमीना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना आकाश लाजुरे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलीस करित आहेत.
Users Today : 12