कल्याण प्रतिनिधी) ठाणे, जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये ए. बी. एम. समाज प्रबोधन संचलित आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रम शाळा बाबरे या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे यांची जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्य पदी निवड झाली आहे. पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विक्रम देशमाने, सचिव पोलिस उप – अधिक्षक (गृह) विकास नाईक , एसीपी सुरेश मनोरे , पीएसआय सुवर्णा अदक , यांच्या समवेत एकूण आकरा सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. आशा नवनाथ रणखांबे यांनी आदिवासी विभागातून मुलांना 18 वर्षे निस्वार्थ ज्ञानदानाचे काम केले असून एक आदर्श अध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून विविध संस्था आणि संघटनेत त्या कार्यरत आहेत, शैक्षणिक , सामाजिक, साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. गर्जा कलामंच मुरबाड यांच्या कडून जिल्हास्तरीय रणरागिणी पुरस्कारने त्या सन्मानित आहेत. सामाजिक विविध उपक्रमात त्यांचा सहभाग नेहमी असतो. आशा नवनाथ रणखांबे यांची जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.