सी. ए. टी. सी. कॅम्प मध्ये एल. आर. टी. च्या कैडेट्स नी पटकावली ट्रॉफी

Khozmaster
3 Min Read

अकोला पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अंतर्गत दि. ४ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर,२०२२ पर्यंत सी. ए. टी. सी. कॅम्प ११४ चे आयोजन करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियनचे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्प मध्ये श्रीमती एल. आर. टि. कॉलेज अकोला, पी. डी. के. व्ही. अकोला, हाॅली क्रॉस अकोला, भारत विद्यालय अकोला, एम. इ. एस. हायस्कूल मेहकर, शिवाजी हायस्कूल मेहकर, मूर्तिजापूर हाईस्कूल मूर्तिजापूर, विद्या मंदिर विद्यालय अकोला व ज्योति जानोरकर विद्यालय अकोला यांचे एकूण ३१६ एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. ०८ दिवस चाललेल्या या कॅम्प दरम्यान कॅडेटला नेतृत्व, एबट्रेकल, फायरिंग तसेच त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या कॅडेट्सला देण्यात आल्या. यामध्ये दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. यूनिटच्या कॅडेट्सनी प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन उत्तम रित्या प्रदर्शन केलेच त्यासोबतच या कॅम्पमध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट नृत्य व संगीत सादर करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळून दिला. त्यांच्या या उत्कृष्ट प्रदर्शना बद्दल कॅम्प कमांडर यांच्या हस्ते कॅडेट्सला ट्रॉफी देऊन सन्मानीत केले गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, आई. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल व एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. यामध्ये सीनियर अंडर ऑफिसर रोहित दिघे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, सार्जंट जयश्री हरसुलकर, कॉर्पोरल शिवानी अवातिरक, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॅडेट प्राची सदांशीव, कॅडेट नैना टोंगऴे, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॅडेट किरण माने, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट अवंतिका खंडार, कॅडेट जय नांदोडे व कॅडेट प्रणव वानखेड़े सहभागी होते. त्याच्या या कामगिरी बद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी एन. सी. सी. कॅडेट्सचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

 

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *