रस्त्यावरील वृक्षतोेड थांबवावी – डॉ. सत्येंद्र भुसारी  

Khozmaster
2 Min Read

चिखली सार्वजनीक बांधकाम उपविभागीय अभियंता यांना दिले निवेदन : रस्त्यावरील वृक्षतोंड थांबविण्यात यावी, व त्या वृक्षांचे संगोपन करावे. रस्त्याच्या रूंदीकरणाचे कारणे दावखवून सदर रूंदीकरणा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक वृक्षांची कत्तल सराष सुरू आहे. ती थांबविणे गरजेचे आहे अषी आग्रही मागणी माजी सभापती डॉ.सत्येद्र भुसारी यांनी उपविभागीय अभियंता श्री दिपक चिंचोले, सार्वजनीक बांधकाम उपविभाग चिखली यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.सदर निवेदनानुसार म्हटले आहे की, चिखली तालुक्यातील काही शासकीय रस्त्यांचे (ग्रामीण मार्ग) रूंदीकरण सध्या सुरू आहे. त्या रूंदीकरणात रस्त्याच्या कडेवर असलेल्या वृक्षांची वृक्षतोड होत आहे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हाणीकारक आहे. चिखली-खंडाळा मकरध्वज-पेनसावंगी या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामास गेल्या महिन्यात सुरूवात झाली. त्यावेळी रस्त्याच्या बाजुची जवळपास 150 लहाने मोठे वृक्ष तोडण्यात आले. त्यातील काही वृक्ष हे 70-80 वर्ष जुने होते. तर काही वृक्ष गेल्या 10-15 वर्षात सामाजिक वनीकरण व सरकारी खात्यातील कर्मचा-यांनी लावलेले होते. त्यावर सरकारचा अर्थात जनतेचा प्रचंड पैसा खर्च केला गेला. मात्र रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा करतील अषी कारणे दाखवुन ते वृक्ष जमीनदोस्त करण्यात आले. हे पर्यावरणास घातक असुन सरकारी पैसेे सुध्दा यात वाया गेले आहेत.एकीकडे झाडे लावा हयासाठी सरकार व अनेक पर्यावरण प्रेमी व जागरूक नागरीक प्रयत्न करीत असतांना झाडे तोंडणे अन्यायकारक आहे. यावेळी उवि अभियंता दिपक चिंचोले यंानी या बाबतीत जातीने लक्ष घालून रस्त्यावरची जुनी मोठी झाडे वाचविण्याचा नक्कीच प्रयत्न करू व तषा सुचना संबध्ंाीतांना देण्यात येतील असे सांगितले.

 

0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *