शेतक-यांच्या पिक विम्या संदर्भातील अडचणी दुर करून तात्काळ पंचनामे करण्यात यावे, व शेतक-यांना पिक विम्याची रक्कम देण्यात यावी, तसेच शेतक-यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई जाहीर करावी. अषा मागणीचे निवेदन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या सुचनेनुसार चिखली तालुका किसान कॉग्रेस सेलच्या वतीने देण्यात आले. दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी किसान कॉग्रेसच्या वतीने तहसलिदार चिखली व कृषी अधिकारी चिखली यांना सदर निवेदन देवुन व शेतक-यांच्या समस्या अडचणी सोडविण्यात याव्यात अषी मागणी करण्यात आली. देण्यात आलेल्या निवेदनानुसार चिखली तालुक्यात गेल्या आठवडयात सतत पाउस पडल्याने शेतक-यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांच्या सोयाबीनची कापणी झालेली नाही, पावसामुळे कापणीला आलेल्या सोयाबीनचीही कापणी करता आली नाही. त्यामुळे सोयाबीनच्या काही शेतात पाणी साचले आहे, अनेक शेतक-यांनी पिक विमा काढलेला आहे, परंतु विमा कंपनीचे सर्व्हेअर शेतात जावुन पंचनामे करायला तयार नाही. तसेच ऑनलाईन तक्रारी कारायला शेतक-यांना प्रचंड अडचणीचा सामाना करावा लागत आहे. अषा वेळी शेतकरी चकरा मारून त्रास्त होत आहेत संबंधीत विमा कर्मचारी, कृषी सहाय्यक व तलाठी यांना सर्व्हे करण्याचे आदेष देवून नुकसानग्रस्त शेतक-यांना विम्याचा लाभ मिळुन दयावा. तसेच शेतक-यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रूपयाची नुकसान भरपाई जाहीर करावी. पिक विम्यांच्या सदरच्या अडचणी दुर केल्या नाही तर तालुका कॉग्रेस किसान सेलच्या वतीने शेतक-यांसह तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईषाराही देण्यात आला आहे.सदर निवेदनावर तालुका किसान सेलचे अध्यक्ष समाधान गिते, पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकरराव धमक, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, कृषीमित्र सचिन बोंद्रे, किसान कॉग्रेसचे उपाध्यक्ष गणेष ठेंग, युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष सुरेष गुंजकर, अॅड.प्रषांत देषमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य भारत खासभागे, रामेष्वर भुसारी, दत्तायत्र करवंदे, लक्ष्मण भिसे, विकास गवारे, दत्तात्रय चव्हाण, प्रकाष गुंजकर, रामदास गिते, सतिष ठेंग, अमोल मोरे, शेख कडु लाला, किषोर जाधव, समाधान पाटील, समाधान भटकर, यांच्या स्वाक्ष-या आहेत.यावेळी तहसिलदार अजितकुमार येळे यांनी यावेळी चर्चा करतांना तलाठी, तालुका कृषी अधिकारी व विमा कपंनीच्या संबंधीत कर्मचा-यांना या संदर्भात तातडीने सुचना दिलेल्या असुन शेतक-यांना पिक विम्या संदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी व पंचनाम्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्याच्या सक्त सुचना दिलेल्या आहेत असे चर्चे दरम्यान सांगितले. तर तालुका कृषी अधिकारी अमोल षिंदे व मंडळ अधिकारी राजु येवले यांनी लगेच पिक विमा कंपनीच्या संबंधीत कर्मचा-यांना कार्यालयात बोलवुन योग्य त्या सुचना दिल्या. शेतक-यांनी नुकसान झाल्यावर 72 तासाच्या आत ऑनलाईन तक्रारी कराव्यात ते शक्य झाले नाही तर पिक विमा कंपनीच्या कर्मचा-यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यासाठी मदत करावी असे सांगितले.
शेतक-यांच्या पिक विम्याच्या अडचणी दुर करून हेक्टरी 50 हजार मदत दया
0
9
4
6
5
1
Users Today : 1
Leave a comment