नवल तेजराव सिरसाट.पालघर जिल्हा प्रतिनिधी. रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेशच्या वतीने वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय समोर केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी दिनांक 5 ऑक्टोबर 2022, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रोजी जाणीवपूर्वक एक वादग्रस्त विधान केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसताना बौद्ध धर्माचा स्वीकार केला.” हे निराधार वक्तव्य देश-विदेशात विविध प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले आणी पाहीले गेले. यामुळे विश्वारत्न, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेल्या महान धम्मक्रांतीचा अवमान करून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जगभरातील समस्त आंबेडकरवादी आणी बुद्धधम्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.तात्काळ त्या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त करीत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी करून रामदास आठवलेला जोडे मारून, तोंड काळे करून गाढवावरून धिंड काढावी असे आदेश दिले होते.म्हणूनच आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने रामदासआठवले यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोडे मारून निषेध व्यक्त केला आणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की, तमाम आंबेडकर अनुयायी आणी बौद्धधम्मीयांच्या धार्मिक भावना रामदास आठवले यांच्या वादग्रस्त विधानाने दुखावल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व अश्या बेजबाबदार व्यक्तीने केंद्रीय मंत्रीपदासारख्या संविधानिक आणी जबाबदार पदावर राहता कामा नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा. पंतप्रधान, भारत सरकार यांना निवेदन करण्यात आले.सदर आंदोलन मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी, मुंबई प्रदेश निरीक्षक विनोदजी काळे, उपाध्यक्ष राजेश शिनगारे, सचिव गजानन तांबे, शशिकांत लिंबारे, वसंत कांबळे, सतीश साळुंखे, जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी, संतोष पवार, भाई जोशी, विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे, मनोज गायकवाड, महिला आघाडीच्या सुनीता डोळस, नसीम शेख, युवा सेनेचे विलास काकडे, सिद्धार्थ गावडे, रवींद्र मयेकर, संतोष हाटे, असे प्रमुख पदाधिकारी, आणी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलनाचे नियोजन उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष सुनिल वाघमारे, आणी तालुका अध्यक्ष संजय मगरे आणी प्रदीप धनवे यांनी केले होते.अशी माहिती संघटनेचे मुंबई निरीक्षक,विनोद काळे.यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Users Today : 25