पातूर शहरात दारू व जुगार अड्ड्यावर छापा पातूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून विशेष पथकाची कारवाई

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :  मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने विशेष पथक अकोला शहरात व जिल्ह्यात अवैध धंद्यावर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की युनियन बँक आठवडी बाजार पातूर येथे काही इसम अवैध रित्या वरली जुगाराच्या आकडयावर नगदी पैश्याची हार जित लावून जुगार खेळत आहेत व एक इसम आपल्या राहत्या घरी अवैध रित्या दारू बाळगुन विक्री करीत आहे तेथे पाहणी केली असता तीन इसम १) शेख अहमद शेख आमद वय ४७ वर्ष रा मुजावपुरा पातूर २) सय्यद राजिक सय्यद बुरहान वय ३२ रा कशिदपुरा पातूर ३)भास्कर तुळशीराम माहुलकर वय ५० वर्ष रा देशमुख वेस पातूर यांच्या जवळून वरली जुगाराचे साहित्य व नगदी रक्कम ४,४२०रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो स्टे पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे व एक इसम सचिन मनोहर गाडगे वय ३८ रा जुना आगीखेड हा आपल्या घरी अवैध रित्या देशदारू विक्री करताना मिळून आला त्याच्या जवळून देशी दारू सखू संत्रा चे एकूण ४४ कॉटर किँमत २९८० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो स्टे पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे(सदर दोन कारवाहित एकूण चार आरोपी विरुद्ध पो स्टे पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्या जवळून ७४०० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे)(सदर कारवाही माननीय पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली)

 

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *