नांदुरा प्रतिनिधी:- तालुक्या मध्येया वर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व जो माल लागला तोही सडायला सुरुवात झाली आहे.अशातच शेत पेरणीपासून ते आतापर्यंत शेतीला लागलेले हजारो रुपये हे मातीत गेले. व आता पीक हाती येण्याचे चिन्ह ही दिसत नसल्याने शेतकऱ्याला त्याची दिवाळी अंधारात दिसू लागली आहे.कर्ज काढून शेती पेरली खरी पण आता ते पैसे फेडणार कसे? बायका पोरांना दिवाळीत काय खाऊ घालायचे,कपडे फटाके कुठून आण्याचे असे अनेकानेक प्रश्न आता जगाच्या पोशिंद्यासमोर उभे आहेत.या प्रश्नांमुळे बळीराजाची झोप उडाली आहे.तरी आपण सरकार मायबाप म्हणून शेतकऱ्याची ही दिवाळी आनंदात साजरी होण्याकरिता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्याच्या खात्यात आर्थिक मदत जमा करा तसेच विमा कंपन्यांना ही शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या हक्काची विम्याची रक्कम त्वरित जमा करण्याचे आदेश द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून नांदुरा तहसील मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका संपर्कप्रमुख सचिन गणगे,तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके,इसापूर शाखा सचिव मधुसूदन पुंडकर,नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,सागर वाघमारे, आसिम खान व इतर उपस्थित होते.
Users Today : 15