प्रतिनिधी . रफिक खान चिखली तालुक्यातील उदयनगर (उंद्री) येथे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे यांना अभिवादन आणि धम्मचक्र परिवर्तन दिन दिन हा संयुक्त कार्यक्रम संदीप भाऊ अंभोरे ता उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम दिनांक 12 ऑक्टोबर दुपारी चार वाजता सुरू करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य दामोदर जी आंभोरे तर प्रमुख उपस्थितीत गणेश रावजी चौकशे वंचित बहुजन आघाडी उत्तर जिल्हाध्यक्ष तसेच अर्जुन बोर्डे संजय धुरंदर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चिखली तालुका शंकर मलवार भाइ प्रदिप अंभोरेअसे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे यांना समाज प्रबोधनातून भीम बुद्ध भीम गीताच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी दत्ताजी शिंदे मुंबई मनोज राजा विकास राजा नागपूर रिताताई खंडारे सपना खरात भाग्यश्री इंगळे देवानंद वानखेडे देवराव मोरे धम्मपाल शिरसाट महेंद्र सावंत तसेच भिवाजी धुरंदर परिसरातील सर्व शाहीर आणि दिग्गज कलावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ गवई यांनी केले तर प्रास्ताविक गजानन धुरंदर आभार प्रदर्शन व प्रशांत झिणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सतीश राजे पैठणे सिद्धांत वानखडे सम्राट अशोक फिटनेस क्लब संविधान महिला मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.
Users Today : 1