चिखली:-परिसरात सुरू असलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून संपूर्ण पावसाळ्यात अधून मधून मध्यम व हलका स्वरूपाचा व पिकांना पोषक असा पाऊस पडल्यामुळे सोयाबीन,कपाशी व तूर हे पिके अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये होती. गत दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे भयभीत झालेल्या शेतकरी वर्गात पिके उत्तम स्थितीत असल्यामुळे यंदाची दिवाळी आनंदात पार पडेल असे वाटत असतांना परतीच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले त्यातही शासनाचे दुटप्पी धोरण, पिक विमा कंपन्यांच्या जाचक अटी, बांधावर जाऊन सर्वे करण्यास होत असलेली दिरंगाई शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे त्यात विमा कंपनीने अडीच हजार शेतकऱ्यांना पिकविमा विविध कारणे सांगुन नाकारला व कृषी विभाग ,विमा कंपनी व महसूल विभाग यांनी कुठल्याही ठोस उपाययोजना न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी श्री अमोल शिंदे व पिक विमा कंपनीचे श्री लहाने यांना घेराव घालून जाब विचारला व तात्काळ संबंधीत कर्मचारी यांना आदेश देऊन योग्य पध्दतीने सर्वे करून शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा अशी मागणी रेटून धरली.या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, मनसे तालुका अध्यक्ष विनोद खरपास, मनविसे जिल्हाद्यक्ष शैलेश कापसे, मनशेसे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर,मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्नील आसोले पाटील, वाहतूक सेनेचे नेते नारायण बापु देशमुख, मनविसे उपतालुकाअध्यक्ष अंकित इंगळे,
शिक्षक सेनेचे संजय जयगुडे सर
महेंद्र इंगळे सर
मनविसे शहर अध्यक्ष अंकित कापसे,जयदीप कापसे सह इतर पदाधिकारी व शेतकरी हजर होते
Users Today : 23