पाऊस थांबता थांबेना, तोंडाशी आलेला घास हिरावला..दिपक मापारी, रिसोड रिसोड तालुक्यातील घोटा, चिखली, परिसरात १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक आकाश भरून आले व विजेच्या कडकडाट सह दोन तास तुफान पाऊस झाला या पावसामुळे परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले होते..परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटीने, अतिवृष्टीने, अतोनात नुकसान केल्यानंतर कसेबसे राहिलेले सोयाबीन कापणीस आले असताना पावसाच्या धुमाकूळने शेतकरी मेटाकुटीस आला आहे..सध्या काही प्रमाणात सोयाबीनची काढणी झाली आहे.तर बहुतास शेतकऱ्यांचा सोयाबीन तयार करणे बाकी आहे. काही शेतकऱ्यांची सोयाबीन सांगून शेतामध्येच आहे. परंतु आता अति पावसामुळे सोंगलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याचे चित्र दिसत आहे. कसाबसा दसरा साजरा केला, परंतु दिवाळीत सोयाबीन घरी येणार अशा आशेने शेतकरी वाट पहात होता. परंतु परतीच्या पावसाने सर्वच परिसरामध्ये तीन ते चार दिवसापासून पावसाने धुमाकूळ घालून दिला आहे.ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या सर्रास होत असून सुद्धा सरकार झोपेचे सोंग घेत आहे. पावसामुळे सर्वच पिके नेस्तानाबुत होऊन सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यात दिरंगाई करत आहे. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे..
Users Today : 4