दिपक मापारी, रिसोड रिसोड मध्ये १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक आकाश भरून आले व विजेच्या कडकडाट सह जवळपास दोन तास तुफान पाऊस झाला या पावसामुळे सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. सिव्हिल लाईनच्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने तसेच डिव्हायडर चे काम अपूर्ण असल्यामुळे या भागात पाणी साचले व यात अनेक वाहने अडकले या दीड ते दोन तासाच्या काळात जवळपास ४० ते ४५ वेळा विजेचा प्रचंड कडकडाट झाला.या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पिकाचे खूप नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या नुकसानीचा त्वरित सर्वे करून शासनातर्फे त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यातर्फे होत आहे. हा पाऊस म्हणजे एक प्रकारे ढगफुटीच असल्याचे जाणवत होते.
Users Today : 1