दिव्यांग विद्यार्थी व शाळेचे अनेकांकडून कौतुक प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..दिपक मापारी, रिसोड रिसोड तालुक्यातील कवठा येथील जागृती शेतकरी बहुउद्देशीय मित्र मंडळव्दारा संचालित आधार निवासी मतिमंद शाळा कार्यशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री वाशिम शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकमध्य सुरू झाली आहे . १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत हे प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे . या जागा मधी सर्वांच्या आंगी कोणता ना कोणता गुण आस्तो आसे मटले जाते. तर तसेच या आधार निवासी मतिमंद शाळा कवठा तालुका रिसोड येथील हे निवासी मतिमंद दीव्यांग विद्यार्थी आसून यांच्या ही त्यांच्या आंगी आशी आगळी वेगळी कला आहे. त्यांच्या कळेला वाव मिळवून देण्याचे कार्य या आधार निवासी मतिमंद शाळा व सर्व कर्मचारी शिक्षक यांच्या कडून केले जात आहे. त्यांच्या कलेतून निर्माण केलेल्या ह्या वस्तूचे प्रदर्शन त्यांनी माडले आहे. त्यांच्या या कऱ्यकिर्तीचे सर्वत्र नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. त्यांनी यामध्ये बनवलेले विविधरंगी सजवलेल्या पणत्या तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे . कोरोनाच्या काळात देखील दिव्यांग विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून ऊर्जा देण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे . शाळेतील विशेष शिक्षक व कला शिक्षक यांनी मागील दोन ते तीन महिण्यांपासुन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रंगकाम करुन घेतले . सदर प्रदर्शनी व विक्रीकरता आकाश वाकळे , अतिश वाकळे , गजानन बांगर व रुद्र नेहूल , गजानन आहेर , शुभम बिडवे , बेबी तडस , नागेश बोडखे , शिवम शिंदे , पवन सुरंगे , सुरज राऊत , धनंजय घुले , संतोषी गिऱ्हे आदी दिव्यांग विद्यार्थी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पुंड , रामेश्वर गव्हाळे , अनिता वाशिमकर , चेताली गोरे , रविंद्र हरीमकर , कृपणा सावसुंदर , रजन बागडे , व रोहित प्रयाल , शिक्षक उपस्थित होते . त्या प्रदर्शन व विक्रीस शहरातील अनेक नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला . व दिव्यांग विद्यार्थी व शाळेचे अनेकांकडून कौतुक होत आहे.
Users Today : 1